Tuesday, March 20, 2018

चैत्रपालवी

बऱ्याच दिवसांच्या धावपळीनंतर आजची सकाळ जरा निवांत उगवली होती तिच्यासाठी. आणि हा निवांतपणा तिला तिच्याही नकळत तिच्या लाडक्या कट्ट्यावर घेऊन गेला. तिच्या घरातला तिचा हक्काचा हा कट्टा. स्वतःच  घर घेताना तिची हि एकमेव अट होती न, घरात खूप उजेड आणि मोकळी हवा खेळवणारी एक मोठ्ठी खिडकी आणि त्याला लागून मस्त पाय पसरून बसायला एक दगडी कट्टा.. तिच्यासाठी हेच मेडिटेशन होतं.. होतं? स्वतःशीच हसली ती ह्या होत्याला.. गेल्या काही दिवसात सगळंच तर असं होत्यातच  जमा झालं होतं.. घर, नोकरी, जॉब सगळ्याच आघाड्या बिनसल्या होत्या.. कि त्या तशाच आहेत अजूनही.. नाही ठाऊक.. स्वतःच्याच विचारात हातातला चहाचा मग आत ठेवायला वळली आणि ती तिथेच थबकली... तिच्या घराबाहेरचा पळस... अरे आत्ता तर ५-१० दिवसांपूर्वी पूर्ण रुक्ष होऊन पानगळीला समोर जाणारा तो हाच का? हाच का तो एकेक पण गळताना तटस्थ उभा होता.. कि आजचा हा खरा.. कोवळी गुलाबी पालवी अंगाखांद्यावर लेऊन एखाद्या लेकुरवाळ्या आईचे रूप ल्यालेला.. ती हरखून बघतच बसली... निसर्गाचं हे रूप तिला तसं नवीन नाहीच.. नेहमीची येतो पावसाळा सारखं हे तर ऋतुचक्र.. पानगळी नंतर नवी पालवी.. काहीतरी गवसल्यासारखं झालं तिला..इतकं निरपेक्ष असतं का खरंच काही? पानगळी सारखं सगळी जळमटं अशी खरंच दूर करता येतात? स्वतःलाच चाचपडून पाहायला लागली ती.. बरंच अंतर चालून आल्यावर स्वतःचं स्वत्वच दूर राहिलंय हे लख्ख जाणवलं तिला .. मनात साचून राहिल्या अपेक्षांची पानगळ एका झुळुकेसरशी उडून गेली... आणि नव्या स्वप्नांची पालवी लेण्या ती आतुर झाली.. नव्याने पुन्हा.. 

क्या करोगे?

गुज़र जाऊं इस पल में तो क्या करोगे? सच मानोगे इस बात को या झूठ कहोगे? सहम जाओगे? डर जाओगे? या रो पड़ोगे तुम? चिल्लाओगे? डांटोगे? या खफा हो ज...