टिपकागद.. भल्या बुऱ्या अनुभवांचा.. आठवणींचा.. जाणीवांचा टिपकागद... आपल्याही नकळत दिवस सरतात, वर्ष संपतात, काहीही न घडता हातोहात फसवत क्षण हातातून निसटतात पण तरी दरवेळी एक नवा दिवस उगवतोच... कोरा करकरीत.. अगदी ह्या टिपकागदासारखा... कालपरवाच एक जुनं वर्ष संपलं. एकसुरी जगलेल्या एका वर्षाचा हाही एक दिवस.. शेवटचा.. शेवट साजरा करण्याचा दिवस... कशी गंमत असते नं, एरवी काहीतरी संपायला आलं कि माणूस अस्वस्थ होतो , नाराज होतो क्वचित दु:खी सुद्धा पण ह्या सरत्या काळाला जो कधीही परतून येणार नाही त्याला निरोप देताना मात्र जल्लोष.. मजा आहे नं .. सतत निमित्त शोधात असतो आपण .. हसण्याचे ,रडण्याचे, काळजीचे आणि हो प्रेमाचेही... सगळी जगण्याची निमित्तं.. आयुष्य सेलिब्रेट करण्याची निमित्तं.... रोज नव्याने समोर आलेला हा कोरा कागद मावळतीला नव्या रंगात माखण्याचं निमित्तं... रंग काही असतोच आणि इंद्रधनुही.. आपण फक्त तो टिपून घ्यायचा.. जपून ठेवायचा... भरजरी जगणं ह्यापेक्षा निराळं ते काय... हो नं !!

Loved it. Keep writing. 👍
ReplyDelete