कधी कधी आपल्याही नकळत एखादं दृश्य, एखादा क्षण मनावर अगदी खोलवर कोरला जातो बघ. आता हेच बघ नं, गेल्या पावसाळ्यात तुझ्या कोकणातल्या घराच्या माडीवर खिडकीत काहीतरी वाचत बसलेला तू...आजही डोळ्यासमोर तितकाच लख्ख दिसतोय रे.. अवघा आसमंत भरून आलेला.
.सगळीकडे त्या काळ्या करड्या रंगाचा धूसर पदर .. अन सोबतीला ओलसर वारा... त्या दिवशी तर भर दुपारी संध्याकाळ झालेली आणि अश्या सगळ्या वातावरणाला सोबतीला घेऊन खिडकतून पाझरणाऱ्या हलक्या प्रकशात आणि बाहेर सुरू असलेल्या पावसाला ऐकत तल्लिनतेने पत्र वाचणारा तू... त्या काळ्या करड्या पार्श्वभूमीवर नितळ शुभ्र तू .. काकणभर जास्तच तेजस्वी दिसत होतास रे.. कोणाचं पत्र ...काय लिहिलं होतं त्यात हे ठाऊक नाही मला खरंतर.. आणि खरंतर जाणून घ्यायची घाई पण नाही.. पण हो इच्छा मात्र नक्की.. कारण गेल्या पावसाळ्यात हा क्षण माझ्या ओंजळीत टाकताना तुझ्या चेहऱ्यावर जे समाधानी खट्याळ हसू होतं ते मला जपायचंय... त्या मनावर कोरल्या फ्रेम सकट.. जपशील न
Sunday, March 31, 2019
मखमल
Subscribe to:
Post Comments (Atom)
क्या करोगे?
गुज़र जाऊं इस पल में तो क्या करोगे? सच मानोगे इस बात को या झूठ कहोगे? सहम जाओगे? डर जाओगे? या रो पड़ोगे तुम? चिल्लाओगे? डांटोगे? या खफा हो ज...
No comments:
Post a Comment