Wednesday, April 17, 2019

गुलमोहोर

आणि मग अचानक आठवतेस तू.. भर दुपारी रणरणत्या उन्हात बंद दारावर एका लयीत थापा मारणारी घामाघूम तू... डोळ्यात नितळ हळवे भाव लेऊन त्या मिटल्या दाराआड तिष्ठत उभी... घामेजलेली, धपापलेली, आसुसलेली तू... आठवतेय सरणाऱ्या प्रत्येक मिनिटा सोबत बदलत जाणारी तुझी नजर.. त्यात बेमालूम मिसळलेली अधीरता .. व्याकुळता आणि भीती... काहीतरी मौल्यवान गमावण्याची... त्या निळ्याशार बंद दारापुढे , नावालाही सावली नसलेल्या दारापुढे , आणि हो नावही नसलेल्या दारापुढे तुला पहिल्यांदा पाहिलं  होतं तेव्हा मला तुझ्यासोबतच दिसला होता तो गुलमोहर... गुलबक्षी बहर ल्यालेला... त्या निळ्या आकाशसमोर स्वतः चं गुलाबी स्वातंत्र्य मिरवणारा..उत्साही प्रसन्न गुलमोहर ... अन सोबतीला तू ...त्या गुलमोहर सारखीच... अन् आज अचानक आठवतोय तो शेवटच... तुझ्या त्या लयदार थापांसकट... जीवाच्या आकांताने लढलेली लढाई हरण्याचा सल डोळ्यात दाटलेली तू  अन् सोबत तो गुलमोहोर.. अवेळी वठलेला.. तुझ्यासारखाच.. बयो वैशाख वणवा सुरू झालाय... जप..

रुचिरा

No comments:

Post a Comment

क्या करोगे?

गुज़र जाऊं इस पल में तो क्या करोगे? सच मानोगे इस बात को या झूठ कहोगे? सहम जाओगे? डर जाओगे? या रो पड़ोगे तुम? चिल्लाओगे? डांटोगे? या खफा हो ज...