(काही काही) बायका कधीही आणि कुठेही अती चिकित्सक का होत असाव्यात बरं? म्हणजे आता गेल्या आठवड्यातलाच किस्सा बघा हा. किराणा मालाच्या दुकानात गेले होते. संक्रांत आणि त्यात महिन्याची सुरुवात... दुकानात तोबा गर्दी, माणसांची आणि सामानाची पण.. सगळा गोंधळ.. त्यात ह्या काकू ( वयाने नाही काही... काहीही विचारता ) dryfruit घ्यायला आलेल्या आणि काऊंटर ला चिपकुन , त्यांच्या चिमुकल्या पोराला त्याच काऊंटर वर बसवून अख्खा काऊंटर राखून उभ्या.. त्यांच्या मागे तिष्ठत उभा अख्खा पब्लिक आणि काकू दुकानदाराला किमान पाच प्रकारच्या फक्त बदाम मागताहेत.. त्यात पुन्हा प्रत्येक प्रकार कसा चांगला आणि वाईट ह्याचं परीक्षण आणि त्यासाठी किमान ५-६ बदमांच सेवन.. मज्जा ना.. " भैया ये वो वाले बदाम नही है" " last time लेके गयी थी ना वो छोटे छोटे थे ( इथे आवाज अगदी लाडिक, पब्लिक मधून किमान चार डोकी वळलीच पाहिजेत) " मग भैय्या ते काढणार बाई ते निवडायला लावणार आणि मग म्हणणार.... "भैय्या ये तो बिलकुल छोटे है"... बस... मागे उभा पब्लिकच्या डोक्यावर हात मारत - अरे माझ्या कर्मा.. तिकडे तो दुकानदार भैय्या डोक्यात चिडचिड आणि तोंडात "ठीक है दीदी आपको मे और बढिया वाले देता हू " म्हणत सामानाच्या गर्दीत गायब.. असं तब्बल अर्धा तास बदाम, काजू, बेदाणे करून काकूंनी शेवटी ते काहीही न घेता मागितलं काय तर विलयची.. फक्त विलयची आणि त्याचं specification काय असेल त्यांचं..
" भैय्या अच्छिवाली इलायची देना ( अर्थात) .. वो हरी हरी वाली मत देना ( विलयची हिरवी नको? बरं ).. उसको आप कलर लगाते हो उपरसे( काय? एवढ्याश्या विलयचीला हा दुकानदार एकेक करत रंग लावतो? तेवढंच राहिलं आहे का ताई आता).. last time लेके गयी थी उसमे अंदर दाना ही नही था( हे आता अतीच हा मागचा पब्लिक आता फुल कावराबावरा, विलयचीत दणा नाही?असं कसं, असं कसं ) ठीकसे देना अब (धमकीच)" बिच्चारा दुकानदार.. तब्बल पाऊण तास दुकानात घालवून काकू घेणार काय तर विलयची आणि तीही कशी तर हिरवी नसलेली आणि quantity किती तर १० gm...संक्रांतीच्या सणाची दुकानात इतकी लगबग सुरू असताना, तीळ गुळ न घेता विलायचीची इतकी चिकित्सा करण्याचा चिकटपणा कुठून बरं येत असेल... म्हणून तर उगाच नाही म्हणते...का असतात बायका इतक्या चिकित्सक.. कुठेही... कधीही
No comments:
Post a Comment